महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena Office Attacked : अमरावतीत खळबळ.. राणा समर्थकांनी केला शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला - आमदार रवी राणा

खासदार नवनीत ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या समर्थकांनी बुधवारी रात्री अमरावती शहरातील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला केला ( Shiv Sena Office Attacked In Amaravati ) आहे. या हल्ल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण असून, शिवसैनिकांनी राणा समर्थकांना पाहून घेण्याचा इशारा दिला आहे.

Shiv Sena Office Attacked In Amaravati
राणा समर्थकांनी केला शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला

By

Published : May 5, 2022, 6:56 AM IST

अमरावती : शहरातील राजापेठ चौकात स्थित शिवसेनेच्या कार्यालयावर राणा समर्थकांनी बुधवारी रात्री हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली ( Shiv Sena Office Attacked In Amaravati ) आहे. राणा समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयातील खुर्च्या पेटले असून कार्यालयाची तोडफोड केली असले की तक्रार शिवसेनेच्या वतीने राजापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरामुळे शहरात खळबळ उडाली आहे.


शिवसैनिक देणार प्रत्युत्तर :शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या ( Yuva Swabhiman Party ) कार्यकर्त्यांना आम्ही पाहून घेऊ असा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख भरगुडे यांनी दिला आहे. कार्यालयात कोणी नसताना राणा समर्थक घुसले आणि त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. पेट्रोलचा शीशा सुद्धा त्यांनी सोबत आणल्या होत्या. आमच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी त्वरित अटक करावी अन्यथा आम्ही स्वतः कार्यालयावरील हल्लेखोरांना धडा शिकवू असे देखील पराग गुडधे यांनी म्हटले आहे.

शिवसैनिक देणार प्रत्युत्तर


राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल : या प्रकरणाची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल झाली असून खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा यांना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानात हनुमान चालीसा पठणासाठी पोलिसांनी अटक केली होती न्यायालयाने त्यांना राजगृहा खाली चौदा दिवसांचा तुरुंगवास सुनावला होता. दरम्यान 12 दिवसानंतर राणा दांपत्याला न्यायालयाने जामीन दिल्यामुळे काही राणा समर्थकांनी राजापेठ चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला यानंतर काही कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यालयात शिरले असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा : Rana Couple Bail : जामीन मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगात, 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details