अमरावती - महाराष्ट्रात विविध समस्या आणि अनेक प्रश्नांनी जनतेला ग्रासले आहे. मात्र याचा कुठलाही विचार करण्याऐवजी किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी तीव्र शब्दात ( Rana Family on Selling Wine ) निषेध नोंदवला आहे.
Rana Family on Selling Wine : नवी पिढी बरबाद करणारा निर्णय; राणा दाम्पत्याने केला राज्य शासनाचा निषेध - Rana Family on Selling Wine
दारू आणि वाईनमध्ये नेमका काय फरक आहे यावर विश्लेषण करून सांगणाऱ्या राज्य शासनाचा करावा तितका निषेध हा थोडाच असल्याचे खासदार नवनीत राणा ( Rana Family on Selling Wine ) यांनी म्हटले आहे.
![Rana Family on Selling Wine : नवी पिढी बरबाद करणारा निर्णय; राणा दाम्पत्याने केला राज्य शासनाचा निषेध Rana Family](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14323512-thumbnail-3x2-rana.jpg)
Rana Family
व्हीडीयो
दारू आणि वाईनमध्ये नेमका काय फरक आहे यावर विश्लेषण करून सांगणाऱ्या राज्य शासनाचा करावा तितका निषेध हा थोडाच असल्याचे खासदार नवनीत राणा ( Rana Family on Selling Wine ) यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे अनेकांच्या हातातले काम गेले असून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या या समस्येवर मात करण्याचा कुठलाही निर्णय हे सरकार घेऊ शकत नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याबाबतचा कुठलाही निर्णय राज्य शासनाने घेतला नाही. मात्र आता गल्लोगल्ली दारू विक्री करण्याचा अजब निर्णय घेण्यास उद्धव ठाकरे सरकारला नेमका काय इंटरेस्ट आहे ?असा सवाल उपस्थित करीत व्यसनमुक्ती अभियानाचा बट्ट्याबोळ करून व्यसनाधीन समाज निर्मितीवर महाराष्ट्र सरकार भर देत असल्याच्या प्रकाराचा आम्ही निषेध नोंदवतो असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
ही कुठली संस्कृती घडवत आहेत
शहरातील आणि गावातील प्रत्येक गल्लीबोळात वाईन विक्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने घेतला आहे. नेमकी कुठली संस्कृती राज्य शासनाला राज्यात निर्माण करायची आहे असा सवाल बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. वाईन विक्रीचा निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. संजय राऊत यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी करणारे असून संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने चमचेगिरी करून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासले जाईल याबाबत विचार करायला हवा असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
Last Updated : Jan 30, 2022, 7:43 PM IST