अमरावती -खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana ) हे 36 दिवसानंतर अमरावतीतील आपल्या शंकरनगर येथील निवासस्थानी ( Rana Couple Reached In Amravati ) पोहोचले असता त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चारात करण्यात आलेल्या या दुग्धाभिषेक सोहळ्याला युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणा दाम्पत्याचे अमरावतीत जल्लोषात स्वागत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी गेलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे 14 दिवसाच्या तुरुंगवात होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. 36 दिवस अमरावती बाहेर असणारे राणा दाम्पत्य आज अमरावती जिल्ह्यात परतले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच राजकमल चौक येथे जल्लोषही करण्यात आला. दसरा मैदान लगतच्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण केले