अमरावती -वाघ (Tiger ) हा वन आणि वन्यजीवांच्या संपन्नतेचे, समृद्धीचे प्रतीक मानला जातो. जगातील सर्वाधिक वाघ आज भारतात आढळतात. पण या वाघांना अनेकदा शिकाऱ्या कडून धोका निर्माण होतो. पण आता मेळघाट (Melghat Tiger Reserve) मधील वाघावर एक मोठं संकट उभे राहले आहे. मेळघाट अद्भूत अशा वनसंपदेने नटलेला प्रदेश या मेळघाटात मोठ्याप्रमाणावर जंगली प्राण्यांची संख्या आहे. त्यात दिवसेंदिवस आता वाघांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. मात्र, जंगलाच संरक्षण करणाऱ्या या वाघावरच एक नवं संकट आल आहे आणि ते संकट आहे लांडग्यांच (Wolf). कारण, मेळघाटमधील एका लांडग्यामध्येआता रेबीजची लागण झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मेळघाटातील लांडग्यांना रेबिजची लागण; वाघांवर ओढावले संकट - मेळघाटातील लांडग्यांना रेबिजची लागण
मेळघाटमधील (Melghat Tiger Reserve) वाघावर एक मोठं संकट उभे राहले आहे. मेळघाट अद्भूत अशा वनसंपदेने नटलेला प्रदेश या मेळघाटात मोठ्याप्रमाणावर जंगली प्राण्यांची संख्या आहे. त्यात दिवसेंदिवस आता वाघांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. मात्र, जंगलाच संरक्षण करणाऱ्या या वाघावरच एक नवं संकट आल आहे आणि ते संकट आहे लांडग्यांच. कारण, मेळघाटमधील एका लांडग्यामध्ये आता रेबीजची लागण झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

मागील काही दिवसांमध्ये 40 नागरिकांवर जीवघेणा हल्ला एका लांडग्याने चढवला होता. त्यांतर मृत्यू झालेल्या या लांडग्याचे नमूने बंगरुळू येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून या मृत लाडग्यालाला रेबीज झाल्याचे समोर आले आहे. तर आणखी मृत्यू झालेल्या एका लांडग्यात देखील हीच लक्षणे असल्याने खळबळ उडाली आहे.
चवताळलेल्या या लांडग्यामुळे जंगलातील वाघ, बिबट इतरीही वन्यप्राण्यांना धोका असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. व्याघ्रप्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी व 50 पेक्षा जास्त कर्मचारी रात्रंदिवस गस्तीवर असून चवताळलेला लांडगा आढळून आल्यास तात्काळ बेशुद्ध करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
मेळघाट प्रादेशिक वनपरिक्षेत्रच्या धुळघाट रेल्वे धारणी परिक्षेत्रात गेल्या महिन्यात दोन लांडग्याने धुमाकूळ घातला होता. पंधरा दिवसांपूर्वी 27 जणांना लांडग्यांनी चावा घेतला होता. त्यामुळे लांडग्याला नागरिकांनी ठार केले होते. त्यामुळे दहशत संपली असे नागरिकांना वाटत असतानाच धारणी परिसरात रविवारी चवताळलेल्या लांडग्याने आठ पेक्षा अधिक जणांना चावा घेतला, यामध्ये एका बालकाचा समावेश आहे.
दरम्यान दुसऱ्या लांडग्याचा ही मृत्यूनंतरचा अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून आता या अहवालाकडे वन विभागासह मेळघाटातील ग्रामस्थांचे लक्ष लागला आहे. दरम्यान या लांडग्यामुळे मात्र नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.