अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पोळा सणाचा उत्साह; बंदी जणांनी सजवले बैल - पोळा सण
मध्यवर्ती कारगृहाच्या मालकीची शेकडो एकर शेत जमीन आहे. या जमिनीवर खुल्या कारागृहातील बंदी शेती करतात. या बंदीजणांच्या सोबत वर्षभर काम करणारे बैलसुद्धा आहे. त्यामुळे पोळा सणाला या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैल पोळा हा सण अमरावतीच्या कारागृहात साजरा केला जातो.
![अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पोळा सणाचा उत्साह; बंदी जणांनी सजवले बैल prisoners celebrated pola festival in amravati central jail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8462601-1007-8462601-1597742892019.jpg)
अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पोळा सणाचा उत्साह
अमरावती- शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणारे बैल व शेतकऱ्यांचा महत्वाचा सण बैल पोळा आहे. यावर्षी कोरोनामुळे अमरावती जिल्ह्यात कुठल्याच गावात पोळा न भरवण्याचा आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढल्याने या सणावर सावट आहे. मात्र, अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहात आज बैल पोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. बंदीजणांनी आज सकाळीच बैल चारून आणल्यानंतर बैलांना अंघोळ घालून, रंग व झुल टाकून सजविण्यात आले.
अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पोळा सणाचा उत्साह