महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shardiya Navratri 2022 : नवरात्रोत्सवासाठी अमरावती सज्ज; अंबादेवी-एकवीरा देवीच्या उत्सवाची तयारी झाली सुरू - श्री एकवीरा देवी अमरावती

अमरावती शहर ( Preparations For Amravati Sajja ) आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी अंबादेवी आणि एकवीरा देवी ( Ekvira Devi ) मंदिरात सुरू झाली आहे. 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ ( Shardiya Navratri 2022 ) होणार असून राज्यभरातील अनेक भाविक नवरात्रोत्सवादरम्यान श्री अंबाआणि श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी ( Darshan of Shri Amba and Shri Ekvira Devi ) अमरावतीत येतात.

Amba and Shri Ekvira Devi
अंबादेवी-एकवीरा देवी

By

Published : Sep 6, 2022, 4:25 PM IST

अमरावती -शहर ( Preparations For Amravati Sajja ) आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी ( Shardiya Navratri 2022 ) अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरात सुरू झाली आहे. 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून राज्यभरातील अनेक भाविक नवरात्रोत्सवादरम्यान श्री अंबाआणि श्री एकवीरा देवीच्या ( Shri Ekvira Devi Amravati ) दर्शनासाठी अमरावतीत येतात. विदर्भाची आराध्य दैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या नऊही दिवस भाविकांची अलोट गर्दी उसळते. नवरात्रोत्सव काळात अंबादेवी मंदिराकडे जाणारे राजकमल ते गांधी चौक, नमुना परिसर ते अंबादेवी मंदिर यासह गौरक्षण रोड ते अंबादेवी मंदिर हे संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जातात. राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त मोठी जत्रा भरते. विशेष म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने नवरात्रोत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर अगदी गजबजून जाते.

नवरात्रोत्सवासाठी अमरावती सज्ज; अंबादेवी-एकवीरा देवीच्या उत्सवाची तयारी झाली सुरू



अंबादेवीचे दर्शन घेऊन श्रीकृष्णाने रुक्मिणीचे केले होते हरण -अमरावती शहरातील श्री अंबादेवीचे ( Amravati Shri Ambadevi ) मंदिर हे अतिशय पुरातन असून भगवान श्रीकृष्णाने कवडण्यपूर येथील राजकुमारी रुक्मिणीला अंबादेवीच्या दर्शनासाठी बोलावून या मंदिरातूनच तिचे हरण केले होते अशी आख्यायिका असून भगवान श्रीकृष्ण स्वतः अंबादेवी मंदिर परिसरात आले असल्यामुळे या संपूर्ण परिसराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.



जिल्ह्यात या ठिकाणी देखील नवरात्रोत्सवात होते गर्दी -अमरावती शहरातील श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दोन ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी होते यासह शहरातील काली माता मंदिर तसेच निरपिंगळा येथील गडावर असणारे पिंगळादेवी मंदिर , चिखलदरा येथील देवीचे मंदिर, कौंडण्यपूर येथील देवीच्या मंदिरासह भातकुली तालुक्यात येणाऱ्या गणोजा देवी या ठिकाणी असणाऱ्या गणोजा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. या सर्वच मंदिरांचे आपले खास वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. नेरपिंगळा येथील पिंगळादेवी ही विहिरीतून प्रकटली असून गणोजा देवी येथील महालक्ष्मी ही गणू महाराजांच्या मागे कोल्हापूर वरून आली असल्याची आख्यायिका आहे. साक्षात कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील ( Kolhapur Mahalakshmi ) गाभाऱ्यात असणाऱ्या मूर्ती प्रमाणेच गणोजा देवी येथील मंदिरात महालक्ष्मीचे रूप पाहायला मिळते.

हेही वाचा :Kanya Pujan 2022: नवरात्रीची अष्टमी आणि नवमी आहे? तिथी आणि कन्या पूजन मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details