महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक: माजी राज्यमंत्री प्रविण पोटेंची "प्रवीण पोटे पाटील डॉट इन" नावाची वेबसाईट पाकिस्तानकडून हॅक

प्रविण पोटे यांचे दौरे, राजकीय कार्यक्रम आणि महत्वाच्या घोषणा प्रसारीत केले जात होते. ती वेबसाईट हाक करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रविण पोटे

By

Published : Sep 3, 2019, 11:54 PM IST

अमरावती - महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री ,अमरावतीचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांची अधिकृत असलेली "प्रवीण पोटे पाटील डॉट इन" या नावाची वेबसाईट पाकिस्तान कडून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रविण पोटेंची वेबसाईट पाकिस्तानकडून हॅक

याच वेबसाईटवर वरुन प्रविण पोटे पाटील यांचे राजकिय कार्यक्रम प्रसारित केले जातात. दरम्यान, या संपूर्ण प्रकारची तक्रार प्रवीण पोटे पाटील यांचे स्वीय सहायक अमोल काळे यांनी सायबर पोलिसांकडे नोंदवली. यासंदर्भात पोलीस सध्या अधिक तपास करीत आहेत. प्रवीण पोटे पाटील हे मंत्री झाल्यावर "प्रवीण पोटे पाटील डॉट इन" ही वेबसाईटवर सुरू करण्यात आली होती. अशी माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details