महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Violence : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक, रजा अकादमीचे तिघे अटकेत - शिवसैनिक अटक

अमरावती हिंसाचार(Amravati Violence) प्रकरणी आज शहर पोलिसांनी(Amravati Police) तीन शिवसैनिकांना अटक केली आहे. तसेच तीन रजा अकादमीच्या तिघांनाही अटक केली आहे. 13 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात हिंसाचार झाला होता.

amravati violence
अमरावती हिंसाचार

By

Published : Nov 22, 2021, 5:43 PM IST

अमरावती -शहरात घडलेल्या हिंसाचारप्रकरणी(Amravati Violence) आज पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, महानगरप्रमुख पराग गुडधे, उपनाम महानगरप्रमुख सुनील तायडे आणि प्रतीक डुकरे या शिवसैनिकांना(Shivsainik arrested in Amravati) अटक केली आहे. तसेच रजा अकादमीच्या(Raza Academy) तिघांना देखील शहर पोलिसांनी अटक केली आहे.

  • 13 नोव्हेंबरच्या हिंसाचारात होते सहभागी?

12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्यावतीने अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ 13 नोव्हेंबर रोजी भाजपच्यावतीने अमरावती बंदचे आवाहन केले होते. त्यावेळीही हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात शिवसेना शहरप्रमुख पराग मुद्दे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेऊन बंदमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, पराग गुडदे, सुनील राऊत आणि प्रतीक डुकरे यांच्या नेतृत्वात नमुना परिसरात शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. यामुळे पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आज या चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • रजा अकादमीच्या तिघांना अटक

12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्यावतीने अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हिंसाचार घडवणार्‍या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सलाउद्दीन उद्दीन, मोहम्मद आरीफ आणि हाजी मोहम्‍मद वजीर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details