अमरावती - शनिवारी (25 एप्रिल) रात्री 10 वाजून 31 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून संवाद साधला. खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यपरिस्थिती विशद केली.
पंतप्रधानांनी उचललेल्या लॉकडाऊनसारख्या कठोर पावलांमुळेच देशातील कोरोना नियंत्रणात आहे. अमेरिकेने केलेला विलंब बघता त्यांची जी दैन्यावस्था झाली ती किमान भारताची झाली नाही, हे केवळ पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे शक्य झाल्याचे राणा म्हणाल्या. ज्या पद्धतीने केंद्रीय आरोग्य पाहणी पथक पुणे, मुंबई येथे आले, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात पाठवावे जेणेकरून वास्तविक स्थितीचा आढावा व योग्य आकडेवारी समोर येईल व आवश्यक त्या उपाययोजना करता येईल, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.