अमरावती - देशावर असलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील अंधःकार दूर सारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभर चांगला प्रतिसाद मिळाला. मोदींच्या आवाहनाला श्रीमंत-गरीब सर्वांनीच आपपापल्या परिने सहकार्य केले. अमरावतीतील रामराव अंबोरे यांच्या घरी अठराविश्व दारिद्र्य असूनही त्यांनी देशाच्या एकतेसाठी एक दिवा आपल्या दारात लावला.
अठरा विश्वे दारिद्र्य, तरीही एक दिवा देशाच्या एकतेचा; पंतप्रधांनांच्या आवाहनाला सर्वच स्तरातून साथ - दिवे लावा
रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅश लाईट सुरू करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशातील सर्वच घटकांतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
हेही वाचा...कोरोनाविरुद्ध लढा: नागपुरात पेटविले घरोघरी दिवे...!
मोझरी गावात रामराम अंबोरे हे मागील दोन वर्षांपासून गावाशेजारी एका झोपडपट्टीत वास्तव्य करत आहेत. त्यांच्या या झोपडीत अद्याप वीज पोहचली नाही. त्यामुळे रोजच ते दिव्यात तेल टाकून आपल्या घर आणि आयुष्य प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तरिही रविवारचा दिवस त्यांच्यासाठी इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. आपली परिस्थिती कशीही असली तरी देशासाठी आणि देशवासियांनी कोरोनाविरोधाच एकजूट व्हायचे, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी आपल्या दारात दिवा लावला होता. नरेंद्र मोदी यांच्य आवाहनाला साथ देणाऱ्या या रामराव अंबोरे यांच्या घरात खरोखर वीज देऊन पंतप्रधान त्यांचे घर केव्हा प्रकाशीत करणार, हे आता पहावे लागेल.