अमरावती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता क्रेडीट कार्ड दिले जाणार (PM Kisan Samman Yojana) आहे. याद्वारे बँकानी मंजूर केलेल्या कर्जातील पैसे गरजेनुसार काढण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँकेकडे अर्ज सादर करुन हे क्रेडीटकार्ड प्राप्त करावे लागेल. जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार (farmers will get credit cards) आहे.
PM Kisan Samman Yojana : 'या' जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड - योजनेद्वारे मिळणार क्रेडिट कार्ड
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता क्रेडीट कार्ड दिले जाणार (PM Kisan Samman Yojana) आहे. याद्वारे बँकानी मंजूर केलेल्या कर्जातील पैसे गरजेनुसार काढण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँकेकडे अर्ज सादर करुन हे क्रेडीटकार्ड प्राप्त करावे लागेल. जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार (farmers will get credit cards) आहे. (PM Kisan Samman Yojana credit cards)
बँकेकडे अर्ज करण्याचे जिल्हा उपनिबंधकाचे आवाहनकिसान क्रेडीट कार्डसाठी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम जमा होणाऱ्या बँकेकडे अर्ज करावा लागणार (PM Kisan Samman Yojana credit cards) आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतर बँकेतर्फे क्रेडीटकार्ड दिले जाते. जिल्हा बँकेला या अनुषंगाने सुचना दिल्या आहेत. अद्याप २४ हजार लाभार्थ्यांकडे क्रेडीट कार्ड नाही. यासाठी त्यांना संबंधित कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन राजेश लव्हेकर, जिल्हा उपनिबंधक यांनी केले (PM Kisan Samman Yojana in Amravati district) आहे.
बँकेचा खातेदार असणे आवश्यकजिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३ लाख ३८ हजार ३०९ शेतकरी लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात. या अर्थसहायामुळे शेतकऱ्यांची बँकेत पत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडीट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणा देखील करु शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडीट कार्ड मिळविण्यासाठी शेतकरी हा संबधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा (farmers will get credit cards in Amravati district) मिळते.