अमरावती कर्जासाठी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने नकली pawned jewelry found to be fake असल्याचे समोर आले. या प्रकरणी युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतल्या Union Bank Jewelry Fraud अधिकारी व कर्मचार्याविरोधात संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल police case against Union Bank करण्यात आला आहे. उज्वल राजेशराव मळसने वय 41 वर्षे राहणार आचल विहार कॉलनी असे फसवणूक customer fraud by union bank झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
असे आहे प्रकरणउज्वल मळसने यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारण ठेवून 3 लाख 30 हजार कर्ज घेतले होते. त्यांच्या दागिन्यांची मूळ किंमत 5 लाख 50 हजार होती. त्यांच्याकडून कर्जाचे हप्ते नियमित फेडणे सुरू होते. 6 ऑगस्ट 2022 रोजी शाखा प्रबंधक यांनी मळसने यांना बँकेत बोलावून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने दाखविले असता ते नकली असल्याचे दिसले. या प्रकारामुळे उज्वल मळसणे हादरले.