महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Clay Lamps for Diwali 2022 : दिवाळीत दूर होणार अंधार, अनाथांना मिळणार आधार; चिमुकले देत आहेत मातीच्या दिव्यांना आकार

दिवाळीच्या पर्वावर अनेकांच्या घरात, अंगणात लख्ख प्रकाश पडावा यासाठी लागणारे मातीचे दिवे अमरावती शहरात गोकुळ आश्रमातील अनाथ मुलं (Orphans of Gokul Ashram are preparing) तयार करीत आहेत. यावर्षी 50 हजार मातीचे दिवे ही मुलं (50 thousand clay lamps for Diwali) तयार करीत असून; दिवाळीत हे दिवे अंधारावर मात करीत असतानाच या अनाथांच्या आयुष्याला आधार देणारे ठरणार आहेत.clay lamps for Diwali 2022

clay lamps for Diwali 2022
मातीच्या दिव्यांना आकार

By

Published : Oct 10, 2022, 3:54 PM IST

अमरावती :दिवाळीच्या पर्वावर अनेकांच्या घरात, अंगणात लख्ख प्रकाश पडावा यासाठी लागणारे मातीचे दिवे अमरावती शहरात गोकुळ आश्रमातील अनाथ मुलं (Orphans of Gokul Ashram are preparing) तयार करीत आहेत. यावर्षी 50 हजार मातीचे दिवे ही मुलं तयार (50 thousand clay lamps for Diwali) करीत असून; दिवाळीत हे दिवे अंधारावर मात करीत असतानाच या अनाथांच्या आयुष्याला आधार देणारे ठरणार आहेत.clay lamps for Diwali 2022




50 हजार दिवे बनविण्याचे टार्गेट :अमरावती शहरात तपोवन परिसरात गुंजन गोळे यांच्या वतीने अनाथ निराधार मुलांसाठी गोकुळा आश्रम चालविले जाते. या आश्रमात 35 ते 40 निराधार चिमुकले आहेत. तसेच तीन निराधार महिलांना देखील गोकुळाखाली छत उपलब्ध झाले आहे. आश्नमातील मुलं शाळा, अभ्यास या सोबतच गत 15 ते 20 दिवसांपासून तास दोन तासाचा वेळ हे मातीचे दिवे बनवणे त्यांना रंग देण्यासाठी काढतात. यावर्षी 50,000 मातीचे दिवे बनविण्याचे टार्गेट गोकुळातील या मुलांनी समोर ठेवले आहे. 50000 पैकी अनेक दिवे बनवून तयार झाले असून; त्यांना विविध रंग देण्याचे काम देखील या मुलांनी केले आहे.



रुग्णवाहिका, स्कूलबस घेण्याचे स्वप्न :दिवाळीनिमित्त तयार केलेले दिवे विकून, जे काही पैसे मिळतील त्यातून आपल्या आश्रमासाठी रुग्णवाहिका किंवा स्कूलबस घेण्याचे स्वप्न आश्रमातील मुलांचे आहे. दिवे विक्रीतून मिळणारे पैसे आणि इतर ठिकाणाहून मिळणारी मदत याद्वारे आमच्या आश्रमात रुग्णवाहिका स्कूलबस नक्की येईल, असा विश्वास त्या चिमुकल्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.


आश्रमातील अनेक मुलं आजारी :गोकुळ आश्रमात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील लहान मुलं आणि मुली वास्तव्याला आहेत. यापैकी अनेक मुलांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे. सतत आजारी पडणाऱ्या ह्या मुलांना नेहमीच रुग्णालयात दाखल करावे लागते. यामुळे यावर्षी दिवे विक्रीतून मिळणारा पैसा रुग्णवाहिका घेण्यासाठी उपयोगी पडेल, असे गोकुळाष्टमाच्या संचालक गुंजन गोळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.



अंध युवक आणि महिलांनाही रोजगार :गोकुळ आश्रमाच्या वतीने शहरातील अनेक महिलांना दिवे बनविण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार प्राप्त झाला. यासह दिव्यांची विक्री करण्याची जबाबदारी काही अंध युवकांनी स्वीकारल्यामुळे या अंध युवकांना देखील या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. विविध आकाराचे हे दिवे रंगविण्याचे काम गोकुळाष्टमातील चिमुकल्यांनी केले आहे.clay lamps for Diwali 2022

ABOUT THE AUTHOR

...view details