महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2022, 8:50 PM IST

Updated : Jun 18, 2022, 10:44 PM IST

ETV Bharat / city

Non Bailable Warrant Against Ravi Rana : मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी आमदार राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर साहित्य कला या प्रकरणात बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे.

Non Bailable Warrant Against Ravi Rana
Non Bailable Warrant Against Ravi Rana

अमरावती -अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर साहित्य कला या प्रकरणात बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? -अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनधिकृतरित्या पुतळा बसवला होता. हा आधिकृत पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्यामुळे आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करीत शहरात महापालिका आयुक्तांनी विरोधात आंदोलन छेडले होते. दरम्यान, नऊ फेब्रुवारी रोजी राजापेठ भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याबाबत तक्रार करून पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांना युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बोलाविले होते. महापालिका आयुक्त राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले असता युवा स्वाभिमान संघटनेच्या तीन महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर यावेळी आठ ते दहा राणा समर्थक घटनास्थळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी यावेळी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी आमदार रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिका आयुक्तांवर साहित्य कला या प्रकरणात आमदार रवि राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला.

हेही वाचा -Lightning Strikes In Nagpur : नागपुरात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

Last Updated : Jun 18, 2022, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details