महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari Attend Workshop : अमरावतीत फळे आणि भाजीपाला निर्यातीवर कार्यशाळेचे आयोजन, नितीन गडकरी राहणार लावणार हजेरी - Gadkari to attend Workshop On Export Of Fruits

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रविवारी 17 जुलै रोजी अमरावतीत येत (Nitin Gadkari In Amravati) आहेत. त्यांची विविध कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता श्रीकुष्ण पेठेत मुकुंद पेठेत रहाटगानकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सायंकाळी 6.45 वाजता ते नागपूरकडे रवाणा होणार आहेत.

Nitin Gadkari In Amravati
मंत्री नितीन गडकरी रविवारी अमरावतीत

By

Published : Jul 17, 2022, 11:06 AM IST

अमरावती : कृषी क्षेत्रात उत्पादनाची निर्यात क्षमता व उत्पादनात वाढ होण्यासाठी अपेडा आणि ऍग्रो व्हिजन फाउंडेशनच्या (Apeda and Agro Vision Foundation) संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भातील कृषी उत्पादने फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर रविवार दिनांक १७ जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 1 ते 3 राखीव वेळ असून 3.30 वाजता संकल्प चौधरी डायलिसिस सेंटर (Chowdhury Dialysis Center Amravati) येथे ता भेट देणार आहेत. दुपारी 4 वाजता हॉटेल रंगोली पर्ल येथे अपेडा व ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाला उपस्थिती राहितील.सायंकाळी 5.45 वाजता मुधोळकर पेठेत रवींद्र खांडेकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता श्रीकुष्ण पेठेत मुकुंद पेठेत रहाटगानकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सायंकाळी 6.45 वाजता ते नागपूरकडे रवाणा होणार आहेत. विदर्भातील शेतजमीन सुपिक आहे. त्यामुळे इथल्या मातीत उगवणारे धान्य असो की फळे किंवा भाज्या प्रत्येक पिकात निर्मिती क्षमता आहे . येथील उत्पादकांना निर्यात धोरणे आणि त्यातल्या संधी विषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे क्षमता असूनही विदर्भातला शेतीमाल उत्पादक मागे राहतो. नेमकी हीच उणीव भरून काढण्यासाठी अपेडा आणि ऍग्रो व्हिजन फाउंडेशन ने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती दिनेश सुर्यवंशी, शिवराय कुळकर्णी यांनी पत्रपरिषदेत दिली. तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे, अपेडाचे अध्यक्ष डॉ. अंगमुत्थू उपस्थित राहतील. इतर प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.तरूण बजाज संचालक अपेडा, रवी बोरटकर अध्यक्ष ऍग्रोव्हिजन फौंडेशन, रमेश मानकर सचिव ऍग्रोव्हिजन, आनंद राऊत हजेरी लावतील.

कार्यशाळेत काय माहिती मिळेल-चार सत्रात होणाऱ्या या कार्यशाळेत विविध विषय हाताळले जाणार आहे. पहिल्या सत्रात कृषी निर्यातीत अपेडाची भूमिका व अर्थसहाय्य योजना. दुसऱ्या सत्रात अमरावती विभागातील लिंबू वर्गीय फळे व ईतर कृषी उत्पादनाची निर्यात क्षमता, विभागातील विविध उत्पादनांच्या निर्यातीची सद्यस्थिती.तिसऱ्या सत्रात निर्यातीमध्ये जिओग्राफिक इंडिकेशनचे महत्व. चौथ्या सत्रात मध्य पूर्व व दक्षिण पूर्व देशात अमरावती हुन ताजी फळे व भाज्यांच्या निर्यातीची संधी भाज्या व फळांच्या निर्यातीत नाबार्ड ची भूमिका या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.

हेही वाचा :MLA Ravi Rana: आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाचे वेध, मतदार संघात मात्र रस्त्यांची बोंबाबोंब

हेही वाचा :Maharashtra Politics : 'ये फेविकॉल जोड है, तुटेगा नहीं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास !

ABOUT THE AUTHOR

...view details