अमरावती -जिल्ह्यातील दूषित पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरापासून ( Amravati City ) 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नया अकोला या गावात ( Naya Akola village ) दूषित पाणी पिल्यामुळे ( Contaminated Water ) अनेकांना अतिसाराची लागण झाली आहे. दुर्दैवाने सुशांत दीपक घोम ( वय 22 ) या युवकाचा मृत्यू देखील झाल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
फुटलेल्या पाईपलाईन मधून पिले पाणी -रविवारी रात्री नया अकोला परिसरातील ग्रामस्थ ( Villager ) कामावरून परत आल्यावर गावालगत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे त्यात दूषित पाणी मिसळले होते. हे पाणी पिल्यामुळे गावात अनेकांच्या पोटात दुखायला लागले. गावातील 10 ते 15 जणांना वलगाव येथील खाजगी रुग्णालयात ( private hospital ) उपचारासाठी ( Treatment ) दाखल करण्यात आले, तर अनेक जणांनी अमरावती शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
सुशांतने ऑटोरिक्षातच घेतला अखेरचा श्वास -अतिसाराची लागण झाल्यामुळे नया अकोला येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी सुशांत घोम याला त्याचे नातेवाईक ऑटो रिक्षातून आणत असताना, अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरापर्यंत ऑटो रिक्षा आली असताना खुशालने तेथेच अखेरचा श्वास घेतला आहे.
दूषित पाण्याचा आणखी एक बळी; कोयलारीत रुग्णांच्या संख्येत वाढ -पाचडोंगरी तसेच कोयलारी या दोन गावात अतिसार ( Diarrhea Disease) या आजाराने थैमान घातले आहे. आज सकाळी 75 वर्षीय मुनिया रंगीसा उईके ( वय 75 ) राहणार कोयलारी ( Pachdongri ) ही महिला अतिसार आजाराची चौथी बळी ( For dies due to contaminated water )ठरली आहे. सकाळी नऊ वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे या आजाराने पाच डोंगरी, कोयलारी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर, ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
विहिरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी -कोयलारी या गावात सध्या रुग्ण वाढत आहेत दोन्ही गावात कॅम्प लावले आहे मेडिसिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे 221 रुग्णांवर कालपर्यंत उपचार केले आहेत. तसेच गावातील विहिरीचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच रुग्णांचे शौचालयाचे नमुने सुद्धा लॅबमध्ये पाठवले आहेत. गावात कॅम्पवर तसेच काट कुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र चुरणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 100 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत तर काही रुग्ण या ठिकाणी भरतीसुद्धा आहेत.
20 जण गंभीर -दूषित पाणी पिल्यामुळे या तिन्ही गावातील एकूण 50 जणांना विषबाधा झाली असून यापैकी 20 जण अति गंभीर आहे. या 20 ही जणांवर चूर्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अमरावतीवरून वैद्यकीय पथक या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. 30 जणांवर काट कुंभ आणि पचडोंगरी या गावात उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी निर्देश दिले आहेत.
हेही वाचा -Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा