महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Navneet Rana : पटोलेंनी राजकारण करू नये नवनीत राणांनी सुनावले - MP Navneet Rana

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला लागलेली आग (fire at baby care center in Amravati) ही अतिशय दुर्दैवी घटना होती मात्र सुदैवाने या या घटनेत सर्व बालक सुरक्षित आहेत, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत नाना पटोले यांनी राजकारण करू नये, असा सल्ला देखील खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना (MP Navneet Rana criticizes Nana Patole) दिला.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Sep 25, 2022, 3:09 PM IST

Updated : Sep 25, 2022, 3:30 PM IST

अमरावती :जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला लागलेली आग (fire at baby care center in Amravati) ही अतिशय दुर्दैवी घटना होती. मात्र सुदैवाने या या घटनेत सर्व बालक सुरक्षित आहेत, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत नाना पटोले यांनी राजकारण करू नये, असा सल्ला देखील खासदारनवनीत राणायांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना (MP Navneet Rana criticizes Nana Patole) दिला.




मागच्या सरकारच्या चुकीने घडलेली घटना -अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. येथील बेबी केअर सेंटरची क्षमता केवळ सत्तावीस असताना या ठिकाणी 35 ते 40 नवजात बालकांना ठेवले जाते. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांनी यासंदर्भात कुठलेही काम केले नाही. मागच्या सरकारचे लक्ष नसल्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून लहान बाळांचे प्राण वाचवले, असे देखील खासदार नवनीत राणा म्हणाल्या. खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून बेबी केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी नवजात बालकांच्या नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन (MP Navneet Rana fire at the baby care center) केले.







जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळणार निधी -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात बैठक असून शासनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोयी सुविधा न करता मोठा निधी मिळणार असल्याचे देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले (MP Navneet Rana visit baby care center) आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा

शॉर्टसर्किटमुळे आग लागली -अमरावती जिल्हा रुग्णालयातील बेबी केअर सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीमुळे बेबी केअर सेंटरमध्ये सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात ( critical condition of childrens ) आहेत. मात्र सुदैैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. धुरामुळे त्रास होत असलेल्या काही बालकांची प्रकृती गंभीर असून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. तसेच दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृती वैद्यकीय महाविद्यालयात ( Punjabrao Deshmukh Medical College ) हलविण्यात आले आहे.

Last Updated : Sep 25, 2022, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details