महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole : "गांधी परिवाराला हात लावाल तर..."; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

जर, गांधी कुटुंबाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस कार्यकर्ता पेटून उठेल, असा इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला ( Nana Patole Warn Bjp )आहे.

Nana Patole
Nana Patole

By

Published : Jun 3, 2022, 3:29 PM IST

अमरावती - भाजपाला सत्तेच्या बाहेर जायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तेव्हा गांधी, नेहरु परिवाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. जर, गांधी कुटुंबाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस कार्यकर्ता पेटून उठेल, असा इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला ( Nana Patole Warn Bjp )आहे. धनगर समाज कार्यकर्ता मेळाव्यानिमित्य नाना पटोले आज ( 3 मे ) हे अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

'भाजपाला प्रेमाचा आणि प्रामाणिक सल्ला' - नाना पटोले म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदीच भाजपा सरकार करत आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सातत्याने 2014 पासून आपण या सरकारची भूमिका पाहिली आहे. त्याच्यामुळे गांधी परिवारातील सदस्याला साधा हातही लावू शकत नाही. या परिवाराच्या त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. ज्या दिवशी या लोकांनी गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केल्यावर महाराष्ट्रासह देशातला काँग्रेस कार्यकर्ता व सामान्य माणूस पेटून उठेल. त्यामुळे त्याच्या वाटेला जाऊ नका हा आमचा प्रामाणिक आणि प्रेमाचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला आहे.

नाना पटोले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात धर्मांधता वाढत चालली आहे, असे म्हणाल्या होत्या.त्यावर सरसंघचालक यांनी सोनिया गांधींच्या विधानाचं समर्थन केलं आहे. आम्ही मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो, असे पटोलेंनी म्हटलं आहे.

राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना पटोलेंनी सांगितले की, राज्यसभेच्या निवडणुका या नेहमीच बिनविरोध होत असतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आमच्या चारही जागा निवडून येतील, असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला.

हेही वाचा -Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार

ABOUT THE AUTHOR

...view details