महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फडणवीस अन् मुनगंटीवार यांच्या पत्नीचाच महाराष्ट्रात विकास - नाना पटोले

अमरावतीत सोमवारी काँग्रेसची महा पर्दाफाश सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली.

काँग्रेसचे प्रदेश प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले

By

Published : Aug 27, 2019, 10:17 AM IST

Updated : Aug 27, 2019, 10:45 AM IST

अमरावती- संपूर्ण राज्य सध्या संकटात आहे. पुरामुळे अनेकांचे जीव जात आहेत, असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाच महाराष्ट्रात विकास होत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी केली आहे.

अमरावतीत सोमवारी काँग्रेसची महा पर्दाफाश सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख चारुलता टोकस, प्रदेश उपाध्यक्ष यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.

अमरावतीत सोमवारी काँग्रेसची महा पर्दाफाश सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेश प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले

मुख्यमंत्र्यांनी स्वतः च्या घरचा विकास केला

यावेळी नाना पटोले म्हणले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत क्लर्क होत्या. खासगी बँकेत जो सर्वाधिक बिझनेस देतो त्याला प्रमोशन मिळते. मुख्यमंत्र्यांनी शासनाचे राष्ट्रीयकृत बँकातील खाती एक्सिस बँकेत वळविल्याने ही बँक नफ्यात आली आणि क्लर्क असणाऱ्या अमृता फडणवीस आज एक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष झाल्या. यामुळेच मुख्यमंत्र्यांना विकास झाला असे वाटत असते. हा विकास राज्यातील सामान्यांचा नाही तर स्वतः च्या घरचा विकास मुख्यमंत्र्यांनी केला असे नाना पटोले म्हणाले.

वाचा - काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची पिढी पुन्हा तयार होईल - बाळासाहेब थोरात

मुनगंटीवार यांनीही पत्नीच्या विकासाचीच काळजी

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या पत्नीच्या विकासाचीच अधिक काळजी घेतली आहे. मुनगंटीवार यांच्या पत्नी या तिरुपती बालाजी मंदिरात विश्वस्त आहेत. आता देशातल्या सगळ्यात श्रीमंत मंदिरातील हे पद आणखी पुढेही टिकून राहावे, यासाठी तिरुपती मंदिराला मुंबईत ५०० कोटी रुपयांची जागा केवळ एक रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज गरिबांना घरकुलसाठी एक रुपयात जागा मिळत नाही. मात्र, पत्नीचे स्थान कायम राहावे यासाठी मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

वाचा -फितुरी करून पक्ष सोडतात ते सूर्याजी पिसाळ - जयंत पाटील

Last Updated : Aug 27, 2019, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details