अमरावती - अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राला दारू पाजून त्याचा दुपट्ट्याने गळा आवळून मित्रानेच हत्या केली (Murder of friend). चांदूरबाजार लागत बिलालपूर ते सोनेरी मार्गावर एका शेत शिवारात ही घटना घडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राची हत्या, चांदूरबाजार येथील घटना - obstacle in love affaire with wife
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे (obstacle in love affaire with wife). अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार येथील घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
असा आहे संपूर्ण प्रकार -बिलालपूर ते सोनेरी मार्गावर असणाऱ्या सुरेंद्र पात्रे यांच्या शेतात एदिलालपूर येथील रहिवासी संदीप याचा मृतदेह शनिवारी आढळून येताच खळबळ उडाली. प्रथमदर्शनी विष घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र पोलिसांना ही आत्महत्या नाही असा दाट संशय होता. पोलिसांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदुरबाजार ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यावेळी त्याची गळा आवळून हत्या झाली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलिसांनी संदीपचा दिलालपूर येथील मित्र योगेश भाकरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला आपल्या स्टाईलने विचारले असता संदीपच्या पत्नीसोबत असणाऱ्या अनैतिक संबंधाची माहिती (obstacle in love affaire with wife) त्याला कळल्याने त्याला मुद्दाम दारू पिण्यासाठी बोलावून त्याला कायमचा संपविला असे मान्य केले.
गुन्हा दाखल आरोपीला अटक - प्रथमदर्शन ही आत्महत्या वाटत असल्यामुळे पोलिसांनी आधी आत्महत्त्येचा गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवाल येताच पोलिसांनी आरोपी योगेश भाकरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांनी स्प्षट केले.