अमरावतीभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Azadi Ka Amrit Mahotsav महाराष्ट्र शासनाने 75 वर्षावरील MSRTC जेष्ठ नागरिकांना एसटी बस मधून मोफत प्रवास योजना 26 ऑगस्ट पासून सुरू केली आहे. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह Amravati Central Bus Station जिल्ह्यातील 8 आगारांमधील बसद्वारे 4354 जेष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे.
सोशल मीडियावर थट्टा, वास्तवात मात्र लाभ75 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मधून मोफत प्रवास योजना राज्य शासनाने जाहीर केल्यावर या निर्णयाबाबत सोशल मीडियावर Social media थट्टा करण्यात आली. वास्तवात मात्र अनेक वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ होत असल्याचे वास्तव अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर पाहायला मिळाले. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून या योजनेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला एकूण 36 ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसद्वारे मोफत प्रवास केला. 27 ऑगस्टला 97 जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. 28 ऑगस्टला 162 तर 29 ऑगस्ट 229 आणि 1 सप्टेंबरला 348 असे प्रत्येक दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती अमरावती आगाराचे वाहतूक निरीक्षक श्रीकांत देवरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.