अमरावती : अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणात (Amravati Love Jihad Case) खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana) यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (case has been filed ) आला आहे. पोलीस डिपार्टमेंटमधील काही मोजके लोक नेत्यांप्रमाणे वर्दीचा गैरवापर करीत आहेत. चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्या तरुणीला सहिसलामत आणून तिच्या पालकांच्या स्वाधिन करून मी माझे कर्तव्य पूर्ण केले. ते मी करत राहील, अशा धमक्यांना, केसेसला घाबरणाऱ्यांमधील मी नाही, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
नवनीत राणा माध्यमांशी बोलताना म्हणाल्याएका पोलीस पत्नीने आपल्याविरूद्ध पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन केले, तक्रारदेखील केली, ते माध्यमांतून समजले. मात्र, त्या पोलीस पत्नीला आपण ओळखत नसून त्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकर्त्या असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आपण न्यायाची, हक्काची लढाई लढत आहोत. ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशांनी आपल्यावर टीका करू नये, असे त्या म्हणाल्या.
अदखलपात्र गुन्ह्यावर नवनीत राणांची प्रतिक्रिया : एका व्यक्तीच्या फिर्यादीवरून खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की कुठल्याही माध्यमातून राणादाम्पत्या विरुद्ध गुन्हे नोंदविले गेले पाहिजे असा काही मंडळींचा इंटरेस्ट आहे, मात्र एखाद्या मुलीला कुणी पळवून नेत असेल तर तिची सोडवणूक करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे कर्तव्य मी पार पाडले आहे.