अमरावती -मला मेडिकल संदर्भात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता मात्र माझ्या कुटुंबियांच्या याला विरोध असल्यामुळे मला राग आल्यामुळे मी घरून निघून गेली होते असे असताना खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी माझ्याबाबत चुकीचे वक्तव्य करून माझी बदनामी केली असल्याचे पोलिसांनी सातारा वरून अमरावतीत आणलेल्या हमालपुरा परिसरातील ( Hamalpura area ) युवतीने केला आहे. ( MP Navneet Rana made a false statement about me, accused the young woman )
Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांनी माझ्याबद्दल केले खोटे वक्तव्य - युवतीचा आरोप - Rajapet Police Station
मला मेडिकल संदर्भात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता मात्र माझ्या कुटुंबियांच्या याला विरोध असल्यामुळे मला राग आल्यामुळे मी घरून निघून गेली होते असे असताना खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी माझ्याबाबत चुकीचे वक्तव्य करून माझी बदनामी केली असल्याचे हमालपुरा परिसरातील ( Hamalpura area ) युवतीने म्हटले आहे. ( MP Navneet Rana made a false statement about me, accused the young woman )
पोलिस करीत आहेत तरूणीची चौकशी -मंगळवारी घरून निघून गेलेली युवती हा लहुजी हा चा प्रकार असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. अमरावती पोलिसांनी या युवतीचा शोध घेतला असता ती सातारा येथे आढळून आली. गुरुवारी दुपारी एक वाजता या युवतीला घेऊन अमरावती पोलिस सातारा येथून अमरावतीच्या दिशेने निघाले होते आज पहाटे साडेपाच वाजता ही युवती अमरावती दाखल झाली. या युवतीला पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. दुपारी एक महिला पोलीस अधिकारी या युवतीची तिच्या घरी येऊन सखोल चौकशी करत आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी केला होता राडा -हमालपुरा परिसरातील आमची मुलगी लव जिहाद ( Love Jihad Case ) अंतर्गत पळवून नेहली असा आरोप करीत खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस (Rajapet Police Station) ठाण्यात बुधवारी ऱाडा घातला होता. त्या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली होती.