अमरावती - अमरावती जिल्ह्यात ( Amravati district ) मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पावसामुळे ( Heavy rain ) अनेक गावांत पूर आला आहे. खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त भागाची पाहणी करून, पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
या गावांमध्ये पोहोचल्या खासदार - पुराचा ( Flood ) तडाखा बसलेल्या तिवसा, नेरपिंगळाई, सातारागाव, राजुरवाडी या पूरग्रस्त गावात खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. पुरामुळे या गावातील अनेक घरे ( Village houses ) कोसळली आहेत. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरात ठेवलेले धान्य, कांदे खराब झाल्यामुळे ते गरिबांना फेकावे लागत असल्याचे खासदार नवनीत राणा यांना आढळून आले आहे. पूर परिस्थितीत अनेक गावांमध्ये योग्य सुविधा नसल्याने खासदार नवनीत राणा यांनी खंत व्यक्त करून प्रशासनाला पूरग्रस्त भागात योग्य मदत करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहे.
शासनाकडून मिळावी मदत - मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. प्रशासनाच्या वतीने या सर्व पूरग्रस्त गावांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि पूरग्रस्तांना शासनाकडून योग्य मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली आहे.