अमरावती -अमरावती शहरात पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार firing in amravati झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली आहे. या घटनेनंतर खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह या जेव्हापासून रुजू झाल्या त्या दिवसापासून अमरावती शहरात सातत्याने गुन्हे वाढत आहेत. आज देखील दोन गटात झालेल्या वादानंतर गोळीबार झाला आणि या गोळीबारात शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली. अमरावती शहरात अशा घटना दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अमरावती शहरातील गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांचा कुठलाही धाक राहिला नाही, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला navneet rana angry on cp aarti singh आहे.
पोलीस आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोपअमरावती शहरात गतकाही दिवसांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त या केवळ भ्रष्टाचाराला खतपाणी देत असल्यामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. दिवसाढवळ्या शहरात हाणामारी होते, गोळीबार होतो. सर्वसामान्य नागरिकांची हत्या होते. मात्र, पोलीस आयुक्त शहरातील गुन्हेगारीवर कुठलाही वचक ठेवू शकत नाही, असेही नवनीत राणांनी म्हटलं आहे.