अमरावती -राज्यभर आज संक्रांतीचा सण (Sankrant Festival) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अमरावती शहरातील न्यू हायस्कूल बेल्पुरा शाळेच्या मैदानावर खासदार नवनीत राणा (MP Navneet Kaur Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आज चिमुक्यांसोबत पतंग (Kite Fly) उडवताना रंगून गेले. यावेळी त्यांनी चिमुकल्यांना पतंग आणि चक्करचे वितरण केले.
अमरावतीत पतंग उडवताना राणा दाम्पत्य - चिमुकल्यांना पतंग आणि चक्करचे वितरण-
संक्रांतीनिमित्त बेलपुरा आणि नजीकच्या गांधीनगर परिसरातील चिमुकल्यांना युवा स्वाभिमानच्या पतंग उत्सवानिमित्त पतंग आणि चक्री वितरित करण्यात आल्या. नायलॉन मांजा कोणीही वापरू नये असा सल्ला यावेळी आमदार रवी राणा यांनी चिमुकल्यांना दिला.
- राणा दाम्पत्याने घेतला पतंग उडवण्याचा आनंद-
चिमुकल्यांसह आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा पतंग उडविण्याचा आनंद लुटला. युवा स्वाभिमान पार्टी असे लिहिलेली भली मोठी पतंग यावेळी राणा दाम्पत्यांनी आकाशात उडवली. यावेळी कार्यकर्त्यांसोबत चिमुकल्यांनी जल्लोष केला.
पतंग उडवताना खासदार नवनीत राणा - पतंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना संदेश-
आकाशात झेपावलेली पतंग ही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी विदर्भातील नाजूक परिस्थितीची माहिती देणारा संदेश आहे. या पतंगीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना आता विदर्भासह राज्यातील नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे अशी विनंती करत असल्याचे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले.
पतंग उडवताना राणा दाम्पत्य लॉकडाऊन लागल्यामुळे शाळा बंद आहेत. लहान मुलेही घरात आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही परंपरेनुसार पतंग उत्सव साजरा करीत आहोत. कोरोना नियमांचे पालन करून साजरा होणारा या पतंगोत्सवात चिमुकल्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे आणि मी सुद्धा चिमुकल्यांसह आनंद लुटत असल्याचे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.