महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary 2022 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो गुरुदेव भक्त वाहणार मौन श्रद्धांजली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची (Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary 2022) आज 54 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने देशभरातून दोन लाखापेक्षा अधिक गुरुदेव भक्त आज गुरुकुंज अमरावतीच्या मोझरी (Mozari) येथे दुपारी चार वाजून 58 मिनिटांनी दोन मिनिटं स्तब्ध (Gurudev devotees will pray silent tribute) होऊन; तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत.Rashtrasant Tukdoji Maharaj

Rashtrasant Tukdoji Maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By

Published : Oct 14, 2022, 1:45 PM IST

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary 2022) यांच्या विचाराने प्रभावीत असणारे प्ररदेशातील 30 ते 35 गुरुदेव भक्त गुरुकुंज मोझरी (Mozari) येथे आज दाखल झालेत. विल पावर हॅरीस या संस्थेचे प्रमुख विल हॅरीस यांच्या नेतृत्वात अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स येथून आलेले गुरुदेव भक्त श्रद्धांजली (Gurudev devotees will pray silent tribute) सोहळ्यात सहभागी होणार आहेत.Rashtrasant Tukdoji Maharaj

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज 54 वी पुण्यतिथी आहे


सर्वधर्मीय प्रार्थना होणार :राष्ट्रसंत असणारे तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरी येथे सर्व धर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशात गुरुकुंज मोझरी हे एकमेव असे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी सर्व धर्मीय प्रार्थना आयोजित केली जाते. विशेष म्हणजे सर्वच जाती, धर्म, पंथाचे गुरुदेव भक्त या सोहळ्यात सहभागी होतात.

मोझरी होणार दोन मिनिटं स्तब्ध : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज 54 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने देशभरातून दोन लाखापेक्षा अधिक गुरुदेव भक्त आज गुरुकुंज अमरावतीच्या मोझरी येथे दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी दोन मिनिटं स्तब्ध होऊन; तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत. श्रद्धांजली वाहण्यापुर्वी प्रचंड मोठा घंटानाद कोला जातो. त्यानंतर श्रद्धांजली वाहीली जाते.



यावली शहीद येथे गर्दी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे यावली शहीद हे जन्मस्थळ आहे. आज सकाळपासूनच यावली शहीद येथील गुरुदेव सेवाश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भक्तांची गर्दी उसळली होती. गुरुकुंज मोझरी येथे जाणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या वाहनांच्या रांगा डवरगाव यावली शहीद मार्गावर दिसुन आल्या.

वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली :अमरावती नागपूर उदगती महामार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्त या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी धृतगती महामार्गावर मोठा जनसमुदाय उसळतो. यामुळे या महामार्गावरील वाहतूक आज दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे.Rashtrasant Tukdoji Maharaj

ABOUT THE AUTHOR

...view details