महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत 'मोटोमॅन' देणार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान; राज्यातला पहिलाच उपक्रम - Motoman entered in amravati

भविष्यात रोजगार आणि प्रगतीचा मार्ग सुकर करणाऱ्या रोबोटिक्स सायन्स या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देणारा 'मोटोमॅन' अमरावती शहरात दाखल झाला आहे.

Motoman latest news
Motoman latest news

By

Published : Oct 31, 2021, 7:20 AM IST

अमरावती -मानवाला विविध मार्गाने मदत करू शकणाऱ्या रोबोट स्वयं संचालित मशीनचा वापर कसा करावा, याचे ज्ञान प्राप्त करून भविष्यात रोजगार आणि प्रगतीचा मार्ग सुकर करणाऱ्या रोबोटिक्स सायन्स या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देणारा 'मोटोमॅन' अमरावती शहरातील विदर्भ युथ सोसायटी संचालित प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड रीसर्च येथील अद्यावत 'रोबोटिक्स लाईफ' मध्ये दाखल झाला आहे.

प्रतिक्रिया

असा आहे 'मोटोमॅन' -

प्रा . राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड रीसर्च या महाविद्यालयातील सुसज्ज अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेत जपानच्या यास्कावा रोबोटिक अंड ऑटोमेशन लॅबोरेटरी येथे निर्माण करण्यात आलेला मोटोमॅन अर्थात रोबोट नुकताच सज्ज करण्यात आला आहे. रोबोटिक्स वेल्डिंग, इंडस्ट्रियल रोबोट प्रोग्रामिंग अँड सिमुलेशन याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यात रोबोटद्वारे केल्या जाणाऱ्या कामाचे ज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेता येणार आहे. या रोबोटच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांना उपयोग होणार असल्याची माहिती यांत्रिकी अभ्यास शाखेचे प्रमुख प्राध्यापक अतुल शिरभाते आणि प्राध्यापक मंगेश गुडधे यांनी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सामंजस्य कराराद्वारे 'मोटोमॅन' अमरावती -

38 वर्षांची परंपरा असणाऱ्या प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट अँड टेक्नॉलॉजी अँड रीसर्च या महाविद्यालयाने जपानच्या यास्कावा रोबोटिक अंड ऑटोमेशन लॅबोरेटरी या कंपनीशी सामंजस्य करार करून 'मोटोमॅन' अमरावतीत आणला आहे. या मोटोमॅन सोबत त्याला स्वयंचलित करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत स्थापित करण्यात आले आहे. या रोबोटमुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि भविष्यात त्यांना लाभ मिळेल, असा विश्वास विदर्भ युथ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा -रोहयो अधिकारी मृत्यू प्रकरण; अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details