अमरावती: मातेने बाळाला जन्म दिला म्हणजे तिची जबाबदारी संपली असे नाही. तर खऱ्या अर्थाने तिच्या जबाबदारीची येथूनच वाढ होत असते. बाळाला संस्कारक्षम करण्याचे काम हीच करत असते; परंतु जेव्हा मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो, तेव्हा ही माता आपल्या अपत्याचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचे पुन्हा एका घटनेने सिद्ध झाले (mother gave life to son in Amaravati) आहे.
किडनी प्रत्यारोपण यशस्वी -नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील किरण अशोक नंदागवळी या मातेने आपल्या मुलाला किडनी दानकरून जीवनदान (mother saved her son life by donating a kidney) दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील, वडिलांचे छत्र नसलेला सोमेश्वर अशोक नंदागवळी हा 24 वर्षांचा तरुण मागील अडीच वर्षांपासून डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार व डायलिसिस घेत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुपर स्पेशालिटी येथे दाखल करण्यात आले होते. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांनी किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णालयाचे हे पंधरावे प्रत्यारोपण (mother donating kidney In Amravati) होते.
या डॉक्टरांनी निभावली महत्त्वाची भूमिका -आरोग्य उपसंचालक डॉ. तरंग तुषारवारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. निलेश पाचबुद्धे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता रुग्णालयाचे डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. सुधीर धांडे यांनी सर्जन म्हणून, तर नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, डॉ. प्रणित काकडे, डॉ. स्वप्नील मोलके, डॉ. हितेश गुल्हाने यांनी व बधीरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. जफर अली, डॉ. प्रणित घोनमोडे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. स्वाती शिंदेकर यांनी काम (mother donating kidney to son In Amravati ) पाहिले. किडनी प्रत्यारोपणाची पूर्वतयारी, वैद्यकीय अहवाल, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे व संपूर्ण प्रस्ताव राज्य प्राधिकरण समिती यवतमाळ यांच्याकडे परवानगी करिता सादर करणे, याकरिता किडनी ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर, डॉ. सोनाली चौधरी व समाजसेवा अधीक्षक सतीश वडनेरकर यांची महत्त्वाची भूमिका होती.
नर्सिंग स्टाफने केली मोलाची मदत -मेट्रन चंदा खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग स्टाफ माला सुरपाम, ज्योती काळे, अनिता मडके, कविता बेरड, संगीता आष्टीकर, दुर्गा घोडीले, नीता कांडलकर, नीलिमा तायडे, तेजस्विनी वानखडे, इन्चार्ज सिस्टर आशा बानोडे, अर्चना डगवार, जमुना मावसकर, किरण आर्वीकर, प्राजक्ता देशमुख, नम्रता दामले, भारती घुसे, अभिजीत देवधर, सुनीता हरणे, कांचन वाघ, नंदा तेटू यांनी शस्त्रक्रिया विभाग व अतिदक्षता विभागामध्ये काम केले.
मोफत शस्त्रक्रिया -किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी होण्याकरिता डॉ. अभिजीत दिवेकर, ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या, डॉ. रेणुका वडुळेकर, विजय मोरे, अमोल वाडेकर, श्रीधर ढेंगे, शितल बोंडे, पंकज बेलूरकर तसेच रुग्णालयीन सर्व डॉक्टर्स, नर्स, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व चतुर्थी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात (Kidney Donation) आली.