अमरावती -अमरावती जिल्ह्यात मान्सून धडकला ( Monsoon begins in Amravati district ) असून शनिवारी 11 वाजल्यापासून अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ( Heavy Rain In Amravati ) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो आहे. शनिवारी सकाळी सूर्य तळपायला लागला असताना दहा वाजता आकाशात काळे ढग दाटून आले आणि 11 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस बरसायला लागला.
मान्सूनचे उशिरा आगमन -अमरावती जिल्ह्याचा संपूर्ण विदर्भात 7 ते 10 जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. हवामान तज्ञांनी या वर्षी 13 ते 15 जून दरम्यान विदर्भात मान्सून धडकणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मान्सून हवामान तज्ञांचा अंदाज चुकवत तीन दिवस उशिरा विदर्भात धडकला. शुक्रवारी अकोल्याला मुसळधार पाऊस झाल्यावर आज अमरावतीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो आहे.