अमरावती -विदर्भ दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) दोन दिवस अमरावतीला मुक्कामी ( Raj Thackeray On Amravati Visit ) आहेत. आज राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( Raj Thackeray will visit Tukdoji Maharaj Samadhi ) यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गुरुकुंज आश्रमाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या समाधीला त्यांनी पुष्पहार घालून वंदन केले.
Raj Thackeray On Amravati Visit : राज ठाकरेंनी घेतले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीचे दर्शन - Maharashtra Navnirman Sena
राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) दोन दिवस अमरावतीला मुक्कामी ( Raj Thackeray On Amravati Visit ) आहेत. आज सकाळी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी घेतले ( Raj Thackeray visits Rashtrasant Tukdoji Maharaj Samadhi ) आहे.यावेळी गुरुकुंज आश्रमाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या समाधीला त्यांनी पुष्पहार घालून वंदन केले.
गुरुकुंज मोझरी येथे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त -राज ठाकरे गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( Rashtrasant Tukdoji Maharaj ) यांच्या दर्शनासाठी पोहोचणार असल्यामुळे गुरुकुंज मोझरी येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते गुरुकुंज आश्रमला देखील भेट ( Raj Thackeray will visit Gurukunj Mozri ) देणार आहेत.
अकरा वाजता कार्यकर्त्यांची बैठक -राज ठाकरे हे अकरा वाजता गुरुकुंज मोझरी येथून अमरावतीला परतणार असून हॉटेल ग्रँड मैफिल येथे ते अमरावती विभागातील अकोला,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि सर्वात अखेर अमरावतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमरावती विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी कशी परिस्थिती काय आहे. भविष्यात पक्ष बळकटीसाठी काय करता येईल. याबाबत अमरावती विभागातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून राज ठाकरे हे विदर्भात पक्ष बळकटीकरणासाठी नवीन योजना आखणार असल्याचे सांगितले जात आहे.