महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...अन् आमदार रवी राणांनी अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून चालविले - राजापेठ अंडरपास

आमदार रवी राणा यांनी राजापेठ अंडरपासची विदारक स्थिती पाहिल्यावर शहर अभियंता मंगेश कडू यांना राजापेठ अंडरपास येथे बोलावले. यावेळी आमदार रवी राणा यांनी शहर अभियंता कडू यांना अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात फिरवले.

आमदार रवी राणा
आमदार रवी राणा

By

Published : Sep 7, 2021, 10:29 PM IST

Updated : Sep 7, 2021, 10:41 PM IST

अमरावती - शहरात मंगळवारी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले. राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे राजापेठकडून दस्तुरनगरकडे जाणारा मार्ग बंद पडला होता. दरम्यान अंडरपासमध्ये साचत असलेल्या पाण्यामुळे आमदार रवी राणा यांनी रोष व्यक्त करत शहर अभियंत्याला चक्क अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यातून जबरदस्तीने चालायला लावले.

रवी राणांनी अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून चालविले

आमदारांनी दिली पाण्यात बुडवण्याची धमकी

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राजापेठ अंडरपास आमदार रवी राणा यांनी राजापेठ अंडरपासचे उद्घाटन केले होते. मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस कोसळत या अंडरपासमध्ये पाणी साचले. पाणी तुंबल्यामुळे दिवसभर हा मार्ग बंद होता. दरम्यान आमदार रवी राणा यांनी राजापेठ अंडरपासची विदारक स्थिती पाहिल्यावर शहर अभियंता मंगेश कडू यांना राजापेठ अंडरपास येथे बोलावले. यावेळी आमदार रवी राणा यांनी शहर अभियंता कडू यांना अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात फिरवले. तसेच या अंडरपा मध्ये यापुढे जर पाणी साचले तर अधिकाऱ्यांना या पाण्यात बुडावतो, अशी धमकी दिली.

'देवेंद्र फडणवीस मौत का कुवा'

आमदार रवी राणा यांनी अंडरपासचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे आता काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कामानिमित्त अमरावतीत आले असता आमदार रवी राणा यांनी त्यांना राजापेठ अंडरपास येथे आणून त्यांच्या हस्तेही या अंडरपासचे उद्घाटन करून घेतले होते. दरम्यान राजापेठ अंडरपास हा जीवघेणा मार्ग असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल माकोडे यांनी राजापेठ अंडरपासच्या ठिकाणी 'देवेंद्र फडणवीस मौत का कुवा' असा उल्लेख असलेले फलक झळकवीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार रवी राणा यांचा निषेध नोंदवला.

हेही वाचा -डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : 15 सप्टेंबरला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार

Last Updated : Sep 7, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details