अमरावती -अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची अतिशय निर्गुण हत्या ( Umesh kolhe Murder Case ) झाली. हे प्रकरण अतिशय गंभीर असताना देखील या प्रकरणाला लुटमारी सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केला ( Amravati police commissioner Aarti Singh ) आहे. गंभीर बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना हे प्रकरण दडपायला सांगितले असून पोलीस आयुक्तांचा मोबाईल फोन यांना एएनआयने ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त आणि प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये झालेला संवाद तपासावा, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.
आमदार रवी राणा यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट -बडनेराचे आमदार रवी राणा आज मुंबईवरून नागपूर मार्गे थेट अमरावतीत पोहोचले. यावेळी त्यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा यांनी कोल्हे कुटुंबियांकडून झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली तसेच कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हे कुटुंबीय दहशतीत - या अतिशय गंभीर घटनेमुळे कोल्हे कुटुंबीय दहशतीत आहे. त्यांच्या घरी असणाऱ्या लहान मुलांना देखील भीती वाटते आहे. उमेश कोल्हे यांची हत्या करणारा खरा मास्तर माईंड कोण आहे, याचा शोध लागायलाच हवा. या प्रकरणाचा संबंध पाकिस्तानशी आहे का याचा छडा सुद्धा एनआयएने लावावा असे आमदार रवी राणा म्हणाले.