अमरावतीमंत्रालयातील उपसचिव असो, परतवाडा शहरातील वाहतूक पोलीस Traffic Police तसेच विविध विभागातील अधिकारी आणि अनेक सर्वसामान्य व्यक्तींना संतापाच्या भरात मारहाण करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू MLA Bachu Kadu हे आपल्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादग्रस्त आहेत. एका आंदोलना प्रकरणात गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने बच्चू कडू यांना सुनावलेल्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court नुकताच दिलासा दिला आहे. आज बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात गणोजा येथे आपल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
4 वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसाला मारहाणपरतवाडा येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला अतिशय शुल्लक कारणावरून चार वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी मारहाण केली होती. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका आढावा बैठकीत बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला चक्क प्लास्टिकची बॉटल फेकून मारल्यामुळे खळबळ उडाली होती.