महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minor Girl Physical Abused: इन्स्टाग्रामवर तरुणाशी झाली अल्पवयीन तरुणीची ओळख, त्याने हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार - लेटेस्ट बलात्काराची बातमी

परभणीतील अल्पवयीन तरुणीची वर्षभरापूर्वी हिंगोलीतील नराधमाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर या नराधमाने चॅटिंग करुन तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. अमरावतीतील हॉटेलमध्ये अत्याचार केल्यानंतर तरुणीला सोडून त्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना अमरावतीतील कोतवाली परिसरात घडली.

minor-girl-physical-abused-
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 5, 2022, 9:15 AM IST

अमरावती -इन्स्टाग्रामवर भेटलेल्या तरुणाने अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली. अत्याचार केल्यानंतर तरुणीला हॉटेलमध्ये सोडून त्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना अमरावतीतील कोतवाली परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अशफाक पठाण अहमद खान या नराधमावर बलात्कारासह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसारही ( पोक्सो ) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्या नराधमाचा शोध घेत आहेत.

वर्षभरापूर्वी आरोपीशी इन्स्टाग्रामवर झाली ओळख -परभणीतील अल्पवयीन तरुणीची वर्षभरापूर्वी हिंगोलीतील या आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर नराधमाने चॅटिंग करून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी नराधम हा त्याच्या गाडीने ( एमएच ३८ व्ही ९२७४ ) तरुणीच्या घरी परभणी येथे पोहोचला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करतो, तुझ्यापासून मला मूल हवे आहे, असे म्हणून त्याने वाहनातच तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडितेला कारने न सोडता तिला परभणीच्या एसटीत बसून दिले. त्यानंतरही फोनवरुन सतत लग्नाचे आमिष दाखवून तिला वाशिम बायपासवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नास नकार देऊन त्याने आपला विश्वासघात केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

सिटी कोतवाली पोलीस ठाणे

पोलीस घेत आहेत आरोपीचा शोध -पीडीत अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या अशफाक पठाण अहमद खान याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या हॉटेलवर पीडीत तरुणीवर अत्याचार झाला, त्या हॉटेल चालकाचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details