अमरावती -महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ( Women and Child Development Minister Yashomati Thakur Corona Positive ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी ( Corona Test ) करुन घ्यावी, असे आवाहन देखील यशोमती ठाकूर यांनी केले आहे. पालकमंत्री ठाकूर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे ( No Corona Symptoms ) दिसत नसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यांच्या निवासस्थानी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- उत्सव, सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन