अमरावती - शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी अमरावतीत असताना बच्चू कडू यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा -'माय-बाप सरकार महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणाऱ्यांकडे लक्ष द्या'; कलावंतांचे सरकारला साकडे
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पेन्शनसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी वेतन कपात झालेल्या 350 कंत्राटी कामगारांना 50 लाख रुपयांच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात काही कामगारांना वितरण केले. या कार्यक्रमानंतर राज्यमंत्री बच्चू कडू चांदूर बाजारला निघाले.
दरम्यान, अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अमरावती सोडण्यापूर्वी अँटीजेन टेस्ट केली. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात बच्चू कडू यांनी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते.