अमरावती -बदल्यांचे प्रश्न आणि प्रशासकीय आस्थापनेकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात वर्कर्स फेडरेशनचे सदस्य निखिल अरुण तिखे हे 9 जुलैपासून विद्युत भवनासमोर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे 19 जुलैला लग्न आहे. वीज प्रशासनाविरुद्ध आंदोलनात सहभागी निखिलला गुरुवारी उपोषण मंडपात हळद लागणार आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर 19 जुलैला आंदोलनस्थळीच लग्नासाठी सनई-चौघडेही वाजणार आहेत.
अमरावतीत उपोषण मंडपात वाजणार सनई-चौघडे - agitation
आपल्या हक्कासाठी निखिल लढा देत असताना त्यांच्या घरच्यामंडळींसह वधू पक्षानेही उपोषण मंडपातच लग्न सोहळा उरकविण्याची तयारी केली आहे. 'लाल सलाम, अविस्मरणीय विवाह सोहळा' असा उल्लेख असणारी निमंत्रण पत्रिकाही छापून वितरित करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या हक्कासाठी निखिल लढा देत असताना त्यांच्या घरच्यामंडळींसह वधू पक्षानेही उपोषण मंडपातच लग्न सोहळा उरकविण्याची तयारी केली आहे. 'लाल सलाम, अविस्मरणीय विवाह सोहळा' असा उल्लेख असणारी निमंत्रण पत्रिकाही छापून वितरित करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी 10.30 मिनिटांनी उपोषण मंडपात हळदीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सकाळी 11.02 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे. महाराष्ट्र सिटी इलेक्ट्रिसिटी व वर्कर्स फेडरेशनने अमरावतीकरांना या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.