अमरावती-गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने जगभरात थैमान आतले आहे. भारतात महाराष्ट्राला या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी कोरोनामुळे आपले आई-वडिलांपैकी एक पालक गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडील गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 570 बालकांना कोरोनामुळे दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
कोरोनामुळे राज्यात 570 बालकांनी गमावले दोन्ही पालक; 'मिशन वात्सल्य'चा मिळणार लाभ - मंत्री ठाकूर - ‘मिशन वात्सल्य’ योजना
कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेले बालक, तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मंत्री ठाकूर
कोरोनामुळे अनाथ 'मिशन वात्सल्य'चा मिळणार लाभ - मंत्री ठाकूर
महत्वाची प्रमाणपत्रे मिळवून देणार-
याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधाने काम केले जाणार असून महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधिक राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Last Updated : Aug 30, 2021, 10:28 AM IST