अमरावती : संपूर्ण जिल्ह्यात लंपीच्या आजाराने थैमान घातले ( Lumpy disease in melghat ) आहे. जिल्ह्यात मेळघाट मधल्या गुरांना याचा अधिक फटका बसला आहे. अशातच या आजारावर उपचार ऐवजी नारळ लिंबूचा उतारा अधिक प्रभावी असल्याचे आदिवासींना वाटते आहे. एवढेच नव्हे, तर काहींनी नवस कबूल केल्याचे चित्रसुद्धा मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागात पाहायला मिळते ( in melghat people vowed god to cure Lumpy disease ) आहे.
'लम्पी' या आजारासाठी मेळघाटातील मुठादेवाला साकडेगुरांवर आलेल्या 'लम्पी' या आजारासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव थेट गावदेव असलेल्या मुठादेवाला साकडे घालत आहे. काहींनी नवस कबूल केल्याचे चित्र गुरुवारी तालुक्यातील चिखली या गावात पाहायला (people vowed to god to cure Lumpy disease ) मिळाले. त्यामुळे आदिवासींची प्रत्येक सुखदुःखात असलेली अंधश्रद्धा पुन्हा एकदा पुढे आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.