अमरावती -भाजपसोबत असलेल्या युतीमुळे नितेश कुमार बिहारमध्ये मुख्यमंत्री ( Chief Minister Nitesh Kumar ) झाले. मात्र, आज नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याप्रमाणे भाजपच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. असे असले तरी, भविष्यात नितीश कुमार यांची गत उद्धव ठाकरे यांच्या सारखीच होईल असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी म्हटले आहे.
भाजपने नितीश कुमार यांना दिला मान -बिहारमध्ये भाजपला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होण्याचा मान दिला होता. बिहारमध्ये काही झाले तरी मुख्यमंत्री पद तुम्हालाच मिळेल असा शब्द अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी नितेश कुमार यांना शब्द दिला होता. मात्र, नितेश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखाच भाजपशी दगाफटका केला असल्याचा आरोप देखील खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.