अमरावती :अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार (leopard died in Amravati) झाला. अमरावती शहरात हॉटेल गौरी इन लगत हा अपघात (leopard died in vehicle collision) झाला.
Leopard Died in Vehicle Collision : भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार (leopard died in Amravati) झाला. अमरावती शहरात हॉटेल गौरी इन लगत हा अपघात (leopard died in vehicle collision) झाला.
नागरी वसाहतीत बिबट्याचे वास्तव्य -अमरावती शहरात एक्सप्रेस हायवेला लागून असणाऱ्या महादेव खोरी, वडाळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर यासह अर्जुननगर परिसरात बिबटचे वास्तव्य वाढले आहे. अर्जुननगर परिसरातून हॉटेल गौरी यांच्या मागे असलेल्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरातून हा बिबट्या पहाटे अचानक महामार्गावर आला. त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाची धडक ह्या बिबट्याला लागली. हा बिबट्या जागीच ठार (leopard died in vehicle collision in Amravati) झाला.
आयुक्तांच्या निवासस्थानी बिबट्याचे वास्तव्य -विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या शासकीय निवासस्थानी देखील गत काही दिवसांपासून बिबट्या फिरत आहे. वनविभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानी बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला होता. मात्र या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप यश आले नाही. यासह श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात देखील बिबट्या आढळून आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या वास्तव्यामुळे अनेक भागात नागरिक भयग्रस्त झाले असून नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी. यासह बिबट्याचे प्राण वाचावे, यासाठी वनविभागाच्या वतीने नागरी परिसरात फिरणाऱ्या बिबट्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी होत (leopard vehicle collision)आहे.