महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

"दांडी यात्रेतून" देशाला आत्मतेज मिळालं - डॉ. आनंद नाडकर्णी - दांडीयात्रेतून देशाला आत्मतेज डॉ आनंद नाडकर्णी

ब्रिटिश सामर्थ्याला धक्का देणारी दांडी यात्रा ही जनशक्तीचे विलक्षण, शिस्तबद्ध अहिंसक तरीही तेजोमय अविष्कार आहे. दांडी यात्रा ही केवळ मिठासाठीची यात्रा नव्हती तर दांडीयात्रेतून देशाला आत्मतेज मिळाले याची ती त्याची कहाणी होय, असे मत नामवंत मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

"दांडी यात्रेतून" देशाला आत्मतेज मिळालं - डॉ. आनंद नाडकर्णी

By

Published : Aug 19, 2019, 8:45 AM IST

अमरावती -आम्ही सारे फाऊंडेशन, मानस उपचार केंद्र आणि टोमोय स्कूल यांच्या संयुक्तवतीने अमरावतीत विमालाबाई देशमुख सभागृहात आयोजित हेरिटेज व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 'महात्मा गांधींनी दांडी यात्रा प्रकल्प नियोजन आणि संवादतत्वे' या विषयावर व्याख्यान दिले.

"दांडी यात्रेतून" देशाला आत्मतेज मिळालं - डॉ. आनंद नाडकर्णी

ब्रिटिश सामर्थ्याला धक्का देणारी दांडी यात्रा ही जनतेच्या विलक्षण शक्तीचे, अहिंसक तरीही तेजोमय आविष्कार

12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून सकाळी साडेसहा वाजता दांडी यात्रा सुरू झाली. 75 जणांसह सूरु झालेल्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी अहमदाबाद शहरात हजारो लोक रस्त्यावर आले, तेव्हाच यात्रा यशस्वी होईल हा विश्वास गांधीना वाटायला लागला. 5 एप्रिल 1930 ला यात्रा दांडीला पोहोचली.

हे आंदोलन देशभर पेटले. काँग्रेसच्या नेत्यांना अटक व्हायला लागल्यावर गांधीजींनी महिलांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करताच उषा मेहता यांच्या नेतृत्वात महिला या आंदोलनात सहभागी झाल्या.

धारासना या गावाकडे गांधीजी आंदोलनासाठी निघाले तेव्हा त्यांना अटक झाली. धारासना येथे आंदोकांवर लाठीचार्ज झाला 2570 सत्याग्रही जखमी झालेत. यानंतर मुंबई, बंगलोर, मद्रास, लाहोर सर्वत्र आंदोलन पेटले. 23 एप्रिलला पेशावरमध्ये अब्दुल गफार खान यांना अटक झाल्यावर इंग्रजांनी गुरखा रेजिमेंटकडून घोडयनद्वारे सत्याग्रहींना चिरडले. शस्त्र बाळणारे पठाण अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करतात याची अधिक भीती इंग्रजांना वाटली.

या आंदोलनात देशभरात 6 लाखाहून अधिक जणांना अटक झाली होती. कारागृहात जागा अपुरी पडायला लागली होती. दांडियात्रा ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना तेज प्रधान करणारी ठरली असे डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले. सर्वसामान्यांच्या त्यागामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने जाण राखा, स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे समरण सदैव समरण करण्याचे आवाहनही डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details