महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक ! क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अळ्या

संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे पहायला मिळत आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील विलगिकरण कक्षातील नागरिकांना दिलेल्या पोह्यात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

larvae in poha
पोह्यात अळ्या

By

Published : May 3, 2020, 8:25 PM IST

अमरावती -संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे पहायला मिळत आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे विलगिकरण कक्षात काही नागरिकांना ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना नाष्टा म्हणून दिलेल्या पोह्यात चक्क अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...धान्य तर दिलं, पण दळण कसं आणायचं? गावी परतल्यानंतरही ऊसतोड मजुरांची फरफट

अमरावतीत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील विविध भागातील संभाव्य कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या विलगिकरण कक्षांमध्ये अनेक ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली आहे, तर काही ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून व्यवस्था करण्यात आली आहे.

विलगिकरण कक्षात दाखल संभाव्य कोरोनाग्रस्तांना योग्य जेवणासह अनेक सुविधा पुरवणे, ही शासनाची जबाबदारी आहे. असे असताना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील विलगिकरण कक्षात सकाळी नाष्टा म्हणून दिलेल्या पोह्यांमध्ये आळ्या आढल्याने खळबळ उडाली आहे.

अळ्या आढळल्याने एका नागरिकाने तक्रार केली. या प्रकारामुळे बराच वेळ गोंधळ सुरू होता. या ठिकाणी नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सकांकडून करण्यात आली आहे. विलगिकरण कक्षात उपस्थित अधिकाऱ्यांनी, असा प्रकार यापुढे होणार नाही, अशा शब्दात सर्वांची समजूत काढली. त्यानंतर विलगीकरण कक्षातील वातावरण शांत झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details