महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Murder स्वातंत्र्य दिन सोहळ्यात वाद युवकाच्या पाठीत भोसकला चाकू - Amaravati Murder

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती शहरातील वडाळी परिसरात डीजे लावून युवक आनंद साजरा करीत असतानाच दोन युवकांनी एका जणासोबत वाद Argument among youths at Independence Day event घातला. दरम्यान त्या युवकाच्या पाठीत चाकू भोकसल्यामुळे खळबळ उडाली.

Amaravati Murder
अमरावती मडर

By

Published : Aug 15, 2022, 11:04 PM IST

अमरावती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती शहरातील वडाळी परिसरात डीजे लावून युवक आनंद साजरा करीत असतानाच दोन युवकांनी एका जणासोबत वाद Argument among youths at Independence Day event घातला. दरम्यान त्या युवकाच्या पाठीत चाकू भोकसल्यामुळे खळबळ उडाली. knife stabbed in back of youth in amaravati


खाजगी रुग्णालयात काढावा लागला चाकूवडाळी परिसरात उड्डाणपूलालगत सोमवारी दुपारी स्वातंत्र्य दिन सोहळा निमित्त डीजे वाजवून आनंद साजरा केला जात असतानाच लगतच्या अशोक नगर झोपडपट्टी परिसरातील दोन युवक कार्यक्रम स्थळी पोहोचले. यावेळी राहुल नगर परिसरातील रहिवासी सम्राट तायडे वय 18 वर्षे याच्यासोबत जुन्या वादातून दोघांनी पुन्हा वाद घातला. दोघांपैकी एकाला सम्राट तायडे येणे झापड मारल्यावर एका युवकाने त्याच्याजवळ असणारा चाकू काढून त्याच्या पाठीत आरपार खुपसला. या घटनेनंतर जखमी सम्राट तायडे याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी हा चाकू काढला तर सम्राट वाचेल याची कुठलीही शाश्वती नाही असे स्पष्ट केल्यावर सम्राटला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सम्राटच्या पाठीत खूपसला असलेला चाकू सावधपणे बाहेर काढल्यावर त्याच्यावर उपचार केले. सध्या सम्राट तायडेची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.


फ्रेझरपुरा पोलिसात गुन्हा दाखलदरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर युवकांनी अमरावती शहरातून पळ काढला. मात्र त्यांना फ्रेजपुरा पोलिसांनी अटक करून पुन्हा अमरावतीत आणले. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सज्ञान असून अल्पवयीन असताना देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचाजम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात एक व्यक्ती जखमी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details