अमरावती- पोलिसांची जबाबदारी ही नागरिकांचे संरक्षण करणे आहे. मात्र, अमरावतीच्या पोलीस आयुक्त या राजकीय दबावात काम करीत होत्या. खरेतर अमरावती 12 आणि 13 नोव्हेंबरला जो काही प्रकार घडल्यानंतर पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरात दडलेल्या अशा दहशतवाद्यांचे पाळेमुळे उपटली असती तर आज कदाचित उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते, असे भाजपचे नेते कपिल मिश्रा ( Kapil Mishra Amravati Visit ) यांनी म्हटले आहे. देशातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावात काम न करता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, असेदेखील कपिल मिश्रा म्हणाले.
कोल्हे कुटुंबियांना केली 30 लाख रुपयांची मदत-नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे अमरावतीत उमेश कोल्हे यांची ( Umesh Kolhe Murder Case ) हत्या झाली. अशा स्वरूपाची घटना राजस्थानमध्ये उदयपूर येथे टेलर कन्हैयालाल याचीदेखील हत्या ( Nupur Sharma post ) करण्यात आली. देशात जिहादी संघटना एका व्यक्तीची हत्या करून लाखो हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आम्ही प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या मागे ताकदीने उभे आहोत. कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हिंदू बांधवांना मदतीसाठी आव्हान करताच अवघ्या 24 तासात आमच्याकडे एक कोटी तीस लाख रुपये जमा झाले.
हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case : 'एनआयए'चे अमरावतीत सर्च ऑपरेशन, सातही आरोपींच्या घरांसह विविध ठिकाणी धाड
कन्हैयालाल याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये-कन्हैयालाल यांची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे मी स्वतः उदयपूरला जाऊन कन्हैयालाल याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिले. आज अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या मुलाच्या बँक खात्यात मी येण्याच्या अर्धा तासापूर्वीच तीस लाख रुपये जमा झाले, असे कपिल शर्मा ( Kapil Mishra help to Kolhe family ) म्हणाले. कोल्हे कुटुंब यांना या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पूर्णतः मदत आम्ही करू, असे देखील कपिल मिश्रा यांनी स्पष्ट केले.