महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bacchu Kadu on Melghat Visit : अंध-अपंग दाम्पत्याला न्याय, रेशन कार्ड साठीची तीन वर्षाची वणवन तीन तासांत थांबवी

सामान्य नागरिकांला (Common People)आपल्त्याा हक्कासाठी कायम सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ज्या रेशन कार्डला(Ration card) दोन तीन महिन्यांचा अवधी लागतो. तिथे मात्र मेळघाट (Melghat) मधील बिहाली गावातील भोला मावस्कर या अंध व्यक्तीला व त्याच्या अपंग पत्नीला तीन वर्षे तहसील कार्यालयाचे उंबरठे झीजहुनही रेशन कार्ड मिळत नव्हते. मात्र मेळघाटात सुरू असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू (State Minister Bachchu Kadu) यांच्या कर्तव्य यात्रेत तीन तासातच या दाम्पत्याला हक्काचे रेशन कार्ड मिळाले आहे.

अंध-अपंग दाम्पत्याला न्याय

By

Published : Dec 7, 2021, 3:21 PM IST

Updated : Dec 7, 2021, 3:38 PM IST

अमरावती: अचलपूर मतदारसंघात पंधरा वर्षापासून सुरू असलेलेली राज्यमंत्री बच्चू कडू यांची राहूटी आता कर्तव्य यात्रा झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाखो लोकांचे कामे मार्गी लागत आहेत. त्यांनी या यात्रेची व्याप्ती वाढवली आहे. मेळघाटचे स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने आता मेळघाटातही ही यात्रा सुरू झाली आहे. कायम मागासलेला भाग असलेल्या या भागातील आदिवासी बांधवांना आजही सरकारी योजनांची माहिती होत नाही. छोट्या छोट्या कामासाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र कडू व पटेल यांच्या उपस्थितीत दोन दिवसात जवळपास अडीच हजार गरजू कुटूंबाना स्वस्त धान्याचे रेशन कार्ड तात्काळ वितरीत करण्यात सोबत प्रलंबित कामाचाही निपटारा करण्यात येत आहे.

अंध-अपंग दाम्पत्याला न्याय
राज्यमंत्र्यांच्या वाहनातून अंध दाम्पत्याचा प्रवासरेशन कार्ड मिळुन दिलेले अंध भोला मावस्कर व त्याची अपंग पत्नी हे आपल्या बिहाली गावी पायदळ जात असताना. राज्यमंत्री कडू यांनी ताफा थांबून या अंध अपंग दाम्पत्याला आपल्या वाहनात बसून गावापर्यंत सोडले. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना दोन बकऱ्या देणार आहेत.नव्वद टक्के काम यशस्वीउपक्रमातून जवळपास नव्वद टक्के काम यशस्वी होत आहे. कडू आमदार झाल्पापासून ही यात्रा सुरू आहे. आधी राहोटी नाव होते. आता मंत्री झाल्याने कर्तव्य यात्रा म्हणून नाव केले आहे. एका गावात परिसरातील दहा गावातील लोक कामे घेऊन येतात. झेरॉक्स, फोटो, स्टँम आदी कागदपत्रे व फॉर्म एकाच ठिकाणी मिळतात. सर्व विभागाचे अधिकारी इथे असतात. रेशन कार्डला दोन दोन महिने थांबावे लागते. परन्तु या यात्रेच्या माध्यमातून एका दिवसातच लाभार्थ्यांला रेशन कार्ड दिले जाते. प्रलंबित कामांचा लगेच निकालराज्यमंत्री म्हणून कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून जनतेची प्रलंबित कामे जागेवरच करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याला सुरूवात केली आहे. या उपक्रमात लाभार्थ्यांना पासपोर्ट फोटो जागेवरच अल्पदरात उपलब्ध होणार असून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, शिधापत्रिकांसह विविध योजनांचे अर्ज मोफत मिळणार आहेत. तसेच या संबंधित योजनांचे अधिकारी या राहुटीत जातीने उपस्थित राहणार असल्याने जागेवरच लाभार्थीची प्रलंबित कामे पुर्ण केल्या जातात.
Last Updated : Dec 7, 2021, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details