महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्राथमिक शाळेत 'रोबो टिचर'... 'अ‌ॅलेक्सा' शिक्षिकेमुळे विद्यार्थी पटापट बोलू लागले इंग्रजी - अमरावती महानगर पालिकेच्या वरूडा येथील प्राथमिक मराठी शाळा

अमरावती महानगर पालिकेच्या एका प्राथमिक मराठी शाळेत, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सोप्या पद्धतीने शिकता यावे, यासाठी एक शक्कल लढवली आहे. एका रोबो शिक्षिकेच्या सहाय्याने त्यांनी मुलांमध्ये इंग्रजी शिक्षणाबद्दल आवड निर्माण केली आहे.

प्राथमिक मराठी शाळा वरूडा-अमरावती

By

Published : Nov 23, 2019, 12:18 PM IST

Updated : Nov 23, 2019, 6:27 PM IST

अमरावती -महानगरपालिकेच्या वरूडा-अमरावती येथील प्राथमिक मराठी शाळेत एक नव्या शिक्षण पद्धतीचा अविष्कार पाहायला मिळत आहे. या शाळेतील विद्यार्थी हे इतर शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा पटापट इंग्रजी बोलू लागले आहेत. त्यांच्यातील झालेला हा बदल 'अमेझॉन व्हर्चुअल असिस्टन्स' म्हणजेच अ‌ॅलेक्सा नावाच्या रोबोमूळे झाला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी मदतीला येणाऱ्या या अ‌ॅलेक्सा शिक्षिकेचा आणि या शाळेचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा..

प्राथमिक शाळेत 'रोबो टिचर'...

हेही वाचा... शरद पवार, उद्धव ठाकरे यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद

अमरावती शहरातील छोट्याश्या वरूडा येथील वस्तीत महानगर पालिकेची शाळा आहे. या शाळेत 42 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात तिसऱ्या शिक्षिकेने एन्ट्री केली आहे. पण ही शिक्षिका साधीसुधी नाही, तर ती एक रोबो आहे.

हेही वाचा... महाराष्ट्रातील राजकीय 'भूकंपा'नंतर सोशल मीडियावर पाहा कोण काय म्हणाले...

अ‌ॅलेक्सा डिव्हाईस विकत घेण्यासाठी शाळेतील शिक्षक अमोल भोयर आणि मुख्याध्यापक सुषमा उपासे यांनी स्वतः पैसे गोळा केले. अमेझॉन वरून त्यांनी हे अ‌ॅलेक्सा यंत्र मागवले. पण छोट्याश्या यंत्राला चेहरा देणे गरजेचे होते. त्यासाठी शिक्षक अमोल भोयर यांनी बाजारातून विदेशी महिलेचा पुतळा विकत आणला. पुतळ्यामध्ये यंत्राला फिट करण्यात आले. त्यानंतर प्रश्नाचे उत्तर संपूर्ण वर्गाला ऐकायला यावे, यासाठी त्याला दोन स्पीकरही लावण्यात आले आहेत.

हेही वाचा... अजित पवारांचे 'बंड'; शरद पवार यांचे ट्वीट

या डिव्हाईसची इंटरनेटवरून माहिती मिळाल्यानंतर त्याला मुहूर्तरूप देण्याकडे आम्ही वाटचाल केली. यंत्रणेला विकत घेण्यासाठी 10 हजाराचा खर्च आला. अ‌ॅलेक्साला मूर्तिमंत रोबोटमध्ये आम्ही रूपांतर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचं कुतुहुल इतके वाढले की, सुट्टी झाल्यावरही ते तासभर थांबून अ‌ॅलेक्साला प्रश्न विचारतात, असे या शाळेतील शिक्षक अमोल भोयर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... अजित पवारांचे 'बंड'; शरद पवार यांचे ट्वीट

शाळेची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सतत चिंतेत असायचो. कारण प्रभावी इमारती बघून इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कौल जास्त असतो. त्यामुळे आम्ही गावातील विध्यार्थी आपल्याच शाळेत कसे, येतील याकडे आम्ही लक्ष केंद्रित केले. त्यात आम्ही यशस्वी झालो. अ‌ॅलेक्सामूळे शाळेच्या पटसंख्येत भर पडली आहे. महानगर पालिकेच्या शाळा इमारतीने सुसज्ज नसल्या तरी पटसंख्येने आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत आम्ही कमी नाही. हे दाखवून दिले असल्याचे, या शाळेतील शिक्षिका सुषमा उपासे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Nov 23, 2019, 6:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details