महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण - आमदार डॉक्टर सुनील देशमुख

अमरावती महापालिका प्रशासनाने आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संकल्पनेनुसार विविध रंगी गुलाबाचे उद्यान साकारले आहे. १ एप्रिल २०१८ पासून या उद्यानाला रोझ गार्डन असे नाव देण्यात आले.

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण

By

Published : Sep 8, 2019, 9:31 AM IST

अमरावती - रंगीबेरंगी गुलाबांनी बहरलेले रोझ गार्डन शहरात साकारण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आय एम ए हॉलच्या लगत असणाऱ्या या गार्डनचे आमदार सुनील देशमुख यांच्या हस्ते रोझ गार्डनचे लोकार्पण होणार आहे.

अमरावती महापालिका प्रशासनाने आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संकल्पनेनुसार विविध रंगी गुलाबाचे उद्यान साकारले आहे. १ एप्रिल २०१८ पासून या उद्यानाला रोझ गार्डन असे नाव देण्यात आले. गायत्री नर्सरीच्या माध्यमातून हे गार्डन साकारण्यात आले आहे. संचालक कांतीकुमार चौधरी यांनी हे उद्यान गुलाब फुलांनी बहरवले आहे. या रोझ गार्डनमध्ये फ्लोरिबंडा, मिनिचर, वेल्ली, गावरान, समर स्नो, व्हॅलेनटाईन यांसह १५० प्रजातींचे गुलाब या गार्डनमध्ये लावण्यात आली आहेत.

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण

आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, असे गायत्री नर्सरीचे संचालक कांतिकुमार चौधरी यांनी सांगितले. ८ सप्टेंबरला सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत या गार्डनचं लोकार्पण होणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details