अमरावती: अमरावती ते अकोला दरम्यान लोणी ते माना गावा दरम्यान दोन्ही बाजूंनी एकूण 75 किलोमीटरचा ( Amravati-Akola highway a world record ) मार्ग 104 तासात पूर्ण करण्यात आला आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केलेल्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. हा विक्रम पूर्ण होताच माना गावालगत फटाके फोडून तसेच भारत माता की जय असा जयघोष करून जल्लोष करण्यात आला.
3 जूनला सकाळी सहा वाजता सुरू झाले होते काम -
अमरावती शहरालगत लोणी या गावापासून 3 जून रोजी सकाळी सहा वाजता या विश्वविक्रमी कामाचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून मंगळवारी (7 जून) रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी हे काम पूर्ण झाले. राधाताई एकूण 800 कर्मचाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदविण्यास महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे, राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख जगदीश कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राजपूत इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख जगदीश कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले
दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून रस्त्याचे रखडले होते काम -
अमरावती ते अकोला हा मार्ग गत दहा वर्षांपासून खराब होता. या मार्गावर 54 किलोमीटर अंतरावर लहान-मोठे 54 पूल आहेत. यापूर्वी एकूण चार कंपन्यांनी या रस्त्याच्या कामाचा कंटाळा करुन काम अर्धवट सोडून पळ काढला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाची नव्याने जबाबदारी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविली होती. या कंपनीचे प्रमुख जगदीश कदम यांनी अमरावती ते अकोला मार्गावर भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या परवा निमित्त एकूण 75 किलोमीटरचा मार्ग बिट्टू मिनस काँक्रीटच्या माध्यमातून सलग 110 तासात करण्याचे निश्चित केले. मात्र हा विक्रम 104 तासातच नोंदविण्यात आला.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने केली पाहणी -
कुरकुम ते माना दरम्यान विश्वविक्रमी काम पूर्ण होताच लंडन वरून आलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने कामाची पाहणी केली. तसेच या रेकॉर्डची नोंद घेतली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने केलेल्या मार्गदर्शनानुसार कामाचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी सर्वाधिक वेगाने बावीस किलोमीटरचा मार्ग तयार करण्याचा विक्रम कतार देशात नोंदविला गेला होता. आज अमरावती जिल्ह्यात लोणी दरम्यान दोन्ही बाजूने 80 किलोमीटरचा मार्ग एकशे चार तासात पूर्ण करून नवा विक्रम नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा -Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या सिमेवर थांबला, विदर्भात 12 जूननंतर होणार दाखल